शाहरुखची बर्थडे पार्टी ‍रात्री एक नंतरही सुरु, पोलिसांनी येवून बंद केला डीजे

Foto

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान याने त्याच्या वाढदिवसानिमित्त एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. मात्र वेळेची मर्यादा न पाळल्याने पोलिसांनी ही पार्टी थांबवली.

मुंबईमध्ये हॉटेल सुरु राहण्याची वेळ रात्री 1 वाजेपर्यंत आहे, मात्र त्यानंतर देखील ही पार्टी सुरुच होती असे पोलिसांनी सांगितले. शाहरुखने त्याच्या 53व्या वाढदिवसानिमित्त मित्रांसाठी या खास पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीच्या ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी वाजत होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी सकाळ पर्यंतही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. 


Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker